तळागाळातून राजकारणात आलेला माणूसच, तळागाळातील लोकांसाठी लोककल्याणकारी राजकारण करू शकतो, ह्याचे उत्तम उदारहरण म्हणजे… १८९ – कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्रशेठ थोरवे ! हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, कर्जत – खालापूरमध्ये त्यांनी जनतेच्या उद्धारासाठी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आणि ह्या भागाला पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवलं.
कर्जत - खालापूरचं नंदनवन करण्याचं त्यांनी जनतेला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केले
प्रशासनावर मजबूत पकड
२०१९ साली कर्जत – खालापूरचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतर, ते आपल्या झपाट्याने काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे आणखी लोकप्रिय होत गेले. आमदारकीची पहिली वेळ असताना सुद्धा प्रशासनावरील आपल्या ताकदीच्या जोरावर सुशासन राबवले. रस्ते, पाणी, वीज असे नागरी हक्क त्यांनी जनतेने मिळवून दिले. त्यांच्या प्रयत्नातून सुसज्ज झालेला कर्जत – चौक रस्ता हा, आज कर्जत – खालापूरकरांसाठी वरदान ठरतो आहे.
भविष्यवेधी दृष्टिकोन
विविध विकासकामे, ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजना’, ‘नळपाणी योजना’, ‘ग्राम सडक योजना’ यासारख्या लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून. कर्जत खालापूरचा भविष्यवेधी आमदार म्हणून, महेंद्र थोरवे ह्यांनी जनतेच्या मनात घर केले. त्यांनी, इथल्या तरुणांसाठी नोकरी मेळावा भरवला, आणि तब्बल १२०० तरुणांना नोकरी मिळवून दिली. ह्या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना सुरक्षित भविष्य देण्याचे महत्वाचे काम केले.
सर्वसमावेशक नीती
जातीपतीच्या आधारावर भेदभाव न करता, सर्व जाती धर्माच्या लोकासांठी उल्लेखनीय काम केले. ज्यात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, असो की, आगरी समाज भवन, बंजारा समाज भवन, जैन समाज भवन अशा विविध समाजांच्या मागण्यांचा मान ठेवून त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली. आदिवासी पाड्यातील फिरत दवाखाना आणि रस्त्याच्या कामांमुळे त्यांना मूळ प्रवाहात येण्यासाठी आधार दिला.
कर्जत - खालापूरचा पर्यटन क्षेत्रातील विकास
कर्जत – खालापूर क्षेत्रातील पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, महेंद्रशेठ थोरवे ह्यांनी ठोस पावले उचलली. माथेरानचा पर्यावरणपूरक विकास केला. पर्यटकांचा ओढा कर्जत – खालापूरकडे वाढेल यासाठी प्रयत्न केले. कर्जत खालापूरच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी विशेष प्रयत्न केले. उल्हास नदीतीरावर उभे केलेले प्रतिपंढरपूर म्हणजे त्यांच्या भक्तिभावाचा नमुना. धाकटी पंढरी आणि महड देवस्थान सुशोभीकरणाने त्यांनी भक्तांचा मान राखला आहे.